राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अकरा खेळाडू गुजरातला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:55+5:302021-08-15T04:23:55+5:30

अहमदाबादला आठवी पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा होत आहे. यामध्ये पाच राज्यांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी अहमदनगर ...

Eleven players leave for Gujarat for National Rifle Shooting Championship | राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अकरा खेळाडू गुजरातला रवाना

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अकरा खेळाडू गुजरातला रवाना

अहमदाबादला आठवी पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा होत आहे. यामध्ये पाच राज्यांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी अहमदनगर शहरातील अकरा खेळाडूंची निवड झाली असून, हे खेळाडू महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. यामध्ये देवेश चतुर, हर्षवर्धन पाचारणे, ओम सानप, यश कदम, जयदीप आगरकर, सुमित वैरागर, पार्थ छाजेड, इरफान सय्यद, वीणा पाटील, रोशनी शेख, राजश्री फटांगडे या शहरातील खेळाडूंचा सहभाग आहे. या खेळाडूंना रायफल शूटिंग प्रशिक्षक सुनीता काळे, ऋषिकेश दरंदले, अलीम शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना स्पर्धेसाठी आमदार संग्राम जगताप, आनंद लहामगे, शशिकांत पाचारणे, घनश्याम सानप, प्रवीण चतुर, नितीन वाघमारे, राहुल कदम, क्रांती सानप, क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे, प्राचार्या भिंगारदिवे यांनी शुभेच्छा दिल्या.

--------------

फोटो - १४गुजरात

पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तूल शूटिंग क्लबचे अकरा खेळाडू शहरातून अहमदाबादला रवाना झाले.

Web Title: Eleven players leave for Gujarat for National Rifle Shooting Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.