जामखेड येथील शेतक-याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:06 IST2018-04-25T13:05:59+5:302018-04-25T13:06:28+5:30
जामखेड : शेतातील पानमळ्याला पाणी देत असताना अचानक विजेचा धक्का बसून विठ्ठल रामदास मगर (वय ४४, रा. लेन्हेवाडी, ता. ...

जामखेड येथील शेतक-याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
जामखेड : शेतातील पानमळ्याला पाणी देत असताना अचानक विजेचा धक्का बसून विठ्ठल रामदास मगर (वय ४४, रा. लेन्हेवाडी, ता. जामखेड) या शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वीच मगर यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता.
मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या पानमळ्यातील शेतात ते पाणी देत होते. जवळच्या वायरला धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उशिरा पानमळ्यातील मुलांच्या लक्षात आली. त्यांनी गावातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काँस्टेबल टी. आर. पवार तपास करीत आहेत.