कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईला जाऊन नगरला परत आलेल्या ज्येष्ठालाही कोरोनाची लागण, भाळवणीतील दोन मुलीही बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:00 IST2020-06-20T13:00:38+5:302020-06-20T13:00:51+5:30
अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित आज बाधित आढळून आला आहे.

कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईला जाऊन नगरला परत आलेल्या ज्येष्ठालाही कोरोनाची लागण, भाळवणीतील दोन मुलीही बाधित
अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित आज बाधित आढळून आला आहे.
मूळचा झारखंड येथील असलेला आणि नगर शहरातील सारसनगर येथे राहणाºया ५८ वर्षीय व्यक्तिलाही कोरोनाची लागण. कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे प्रवास करून आला होता.
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपकार्मुळे झाली लागण.
संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष आणि जोर्वे येथील ४५ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल.झाले होते.
आता जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या ही२८२ इतकी झाली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७ इतकी झाली आहे.