कोविडच्या लसीकरणासाठी ज्येष्ठांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:44+5:302021-03-24T04:18:44+5:30

पिंपळगाव पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६० वर्षांवरील व ४५-५९ वयोगटांतील विविध ...

Elderly response to covid vaccination | कोविडच्या लसीकरणासाठी ज्येष्ठांचा प्रतिसाद

कोविडच्या लसीकरणासाठी ज्येष्ठांचा प्रतिसाद

पिंपळगाव पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६० वर्षांवरील व ४५-५९ वयोगटांतील विविध आजार असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीकरण चालू आहे.

या उपकेंद्रात आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. एका दिवशी सुमारे शंभर लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी आतापर्यंत ६५० ते ७०० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. नागरिकांना लसीकरणादरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयदेवी राजेकर व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

फोटो - २३ विसापूर

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांचा कोवीड १९च्या लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

छायाचित्र- नानासाहेब जठार, विसापूर.

Web Title: Elderly response to covid vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.