श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाणला आठ वर्षाच्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू, तिघे वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:50 IST2020-06-20T15:50:16+5:302020-06-20T15:50:56+5:30

श्रीगोंदा -श्रीगोंदा शहराजवळील भिंगाण येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा अविनाश गणेश तोरडमल (वय ८ वर्षे) आपल्या तीन मित्रांबरोबर देवनदी मधील डोहामध्ये पोहावयास गेला होता. पोहताना डोहात बुडून अविनाश तोरडमलचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली.

An eight-year-old boy drowned in a pond at Bhingan in Shrigonda taluka, three survived | श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाणला आठ वर्षाच्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू, तिघे वाचले

श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाणला आठ वर्षाच्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू, तिघे वाचले

श्रीगोंदा -श्रीगोंदा शहराजवळील भिंगाण येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा अविनाश गणेश तोरडमल (वय ८ वर्षे) आपल्या तीन मित्रांबरोबर देवनदी मधील डोहामध्ये पोहावयास गेला होता. पोहताना डोहात बुडून अविनाश तोरडमलचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली.
अविनाशला मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत पाण्यात बुडाला त्यांचा मृत्यू झाला. त्याचे मित्र ओंकार बर्डे,सोहम तोरडमल ओम बर्डे हे बालबाल बचावले आहेत. ललीता विशाल बर्डे या महिलेने घटनास्थळाकडे धाव घेतली.त्यामुळे तिघांचा जीव वाचला.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल झुंजार अधिक तपास करीत आहेत.
 
Web Title: An eight-year-old boy drowned in a pond at Bhingan in Shrigonda taluka, three survived