शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ हजार मुले कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये मे २०२१ या एकाच महिन्यामध्ये ० ते १८ वयोगटातील ८ हजार ८८१ मुलांना कोरोनाची लागण ...

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये मे २०२१ या एकाच महिन्यामध्ये ० ते १८ वयोगटातील ८ हजार ८८१ मुलांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी ‘लोकमत’ ला दिली. यातील शंभर टक्के मुले बरे होऊन घरीही गेली आहेत.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. एकट्या एप्रिल महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ८०,११८ इतके कोरोनाबाधित आढळून आले, तर मे २०२१ या एका महिन्यामध्ये ८७, ०९५ एवढे कोरोबाधित आढळून आले. एप्रिल व मे-२०२१ महिन्यामध्ये बाधित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. एप्रिल-मे मध्ये एकूण चाचण्यापैकी बाधित होण्याचे प्रमाण (पॉझिटिव्ह रेट) हे ४२ ते ५१ टक्‍क्‍यांपर्यंत गेले होते. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, रेमडेसिविरची टंचाई होती. जिल्ह्यात रुग्णांना बेडही मिळत नव्हते. जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण वाढलेले होते. अशा कुटुंबामध्ये साहजिकच लहान मुलांचाही समावेश होता. तसेच ते त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यामुळे चाचणी केल्यानंतर त्यांच्याही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. परंतु त्या मुलांना कुठलीही कोरोनाची लक्षणे नसल्याने त्यांना घरामध्येच विलगीकरणात ठेवले होते. काही मुले कोविड सेंटरमध्ये दाखल होती. लहान मुलांमध्ये गंभीर अशी कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

------

पहिल्या लाटेतही लहान मुले बाधित झाली होती. दुसऱ्या लाटेमध्येही लहान मुले बाधित झाली आहेत. एकूण बाधित रुग्णांपैकी लहान मुले बाधित होण्याचे एप्रिल व मे महिन्यातील प्रमाण हे अनुक्रमे ९ ते ११ टक्के इतके आहे. एकाच कुटुंबांमध्ये अनेक जण पॉझिटिव्ह येत असल्यामुळे साहजिकच त्या कुटुंबामध्ये लहान मुलांचाही समावेश असतो. त्यामुळे मुलांच्याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. तशी कोणतीही चिंता करण्यासारखी स्थिती नाही.

- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक

-----

जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यात कोरोबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांच्याच चाचण्या करण्यात येत होत्या. त्यात कुटुंबातील लहान मुलांचाही समावेश होता. एकाच मे महिन्यात ८ हजार ८८१ मुले बाधित झाली. लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशाही सूचना जिल्हा रुग्णालयाला दिल्या आहेत.

- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

-----

असे आहेत एकूण पॉझिटिव्ह

एप्रिल -२०२१- ८०११८

मे-२०२१- ८७०९५

----

अशी आहेत लहान मुले बाधित (मे-२०२१)

वयोगट बाधित

० ते १ - ८५

१ ते १२- २६९४

१३ ते १८ - ६१०२

एकूण - ८८८१