तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांसह कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST2021-05-21T04:21:22+5:302021-05-21T04:21:22+5:30

रघुवीर खेडकर यांच्या बहिणीला त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. ...

Eight members of the family, including tamasha artist Raghuveer Khedkar, contracted corona | तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांसह कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांसह कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

रघुवीर खेडकर यांच्या बहिणीला त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. कुटुंबातील इतरही सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रघुवीर खेडकर यांच्यासह त्यांच्या तीन बहिणी, मेहुणे, भाचा, सुना अशा एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. माणिकराव शेवाळे यांनी सांगितले.

-----------

रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबातील काही जणांचा एचआरसीटीचा स्कोअर थोडा अधिक आहे.

त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन देऊन उपचार सुरू आहेत. काहींना ऑक्सिजनची अत्यंत गरज भासते आहे. इतरही इंजेक्शन त्यांना द्यावे लागत आहेत. खेडकर कुटुंबातील सर्व सदस्य लवकर बरे व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न करतो. खेडकर कुटुंबाचा मी फॅमिली डॉक्टर आहे.

- डॉ. माणिकराव शेवाळे, रघुवीर खेडकर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार करणारे डॉक्टर.

Web Title: Eight members of the family, including tamasha artist Raghuveer Khedkar, contracted corona