बस अपघातात आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 00:03 IST2016-04-06T23:53:20+5:302016-04-07T00:03:48+5:30
अहमदनगर : खामगाव-पुणे या एस. टी. बसला शेंडीजवळ बुधवारी दुपारी चार वाजता अपघात झाला. या अपघातात आठ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

बस अपघातात आठ जखमी
अहमदनगर : खामगाव-पुणे या एस. टी. बसला शेंडीजवळ बुधवारी दुपारी चार वाजता अपघात झाला. या अपघातात आठ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खामगाव-पुणे या बसला औरंगाबाद येथून नगरकडे येत असताना शेंडीजवळ अपघात झाला. एक ट्रक पाठीमागे येत होता. अचानक मागे आलेल्या या ट्रकमुळे एस.टी. चालकाचे नियंत्रण सुटले आणि एस.टी. बस एका तारेच्या कुंपणावर जावून पलटी झाली. यामध्ये ८ प्रवाशी जखमी झाले. इतर कोणालाही इजा झाली नाही,असे तारकपूर आगारप्रमुख प्रमोद नेहुल यांनी सांगितले.