२०२२पर्यंत निळवंडेचे पाणी कालव्यांद्वारे आणण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:08+5:302021-05-17T04:19:08+5:30

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ रविवारी (दि. १६) आयोजित करण्यात आला होता. या ...

Efforts to bring Nilwande water through canals by 2022 | २०२२पर्यंत निळवंडेचे पाणी कालव्यांद्वारे आणण्यासाठी प्रयत्न

२०२२पर्यंत निळवंडेचे पाणी कालव्यांद्वारे आणण्यासाठी प्रयत्न

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ रविवारी (दि. १६) आयोजित करण्यात आला होता. या समारंभात महसूलमंत्री थोरात हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर तांबे होते. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, गणपतराव सांगळे, अमित पंडित, शंकरराव खेमनर, शिवाजीराव थोरात, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, रामदास वाघ, आर. एम. कातोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळविला आहे. मागील दीड वर्षात दोनदा करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मजूर स्थलांतरित झाले. या कामात अडथळे येत आहे. तरीदेखील २०२२च्या पावसाळ्यातील पाणी शेतकर्‍यांना देण्याचा आपला प्रयत्न आहे.

कारखान्याने यावर्षी १९२ दिवसांत विक्रमी १३ लाख १९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. नवीन कारखाना निर्मितीचा निर्णय हा अत्यंत लाभदायी ठरला आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबकसह आधुनिक प्रणालीचा वापर करावा लागेल.

संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, इंद्रजित खेमनर, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे, अभिजित ढोले, दादासाहेब कुटे, अनिल काळे, विनोद हासे, माणिक यादव, आर.बी. रहाणे, आर.बी. सोनवणे, संपतराव डोंगरे, विष्णू राहटळ, शांताराम कढणे, दत्तू खुळे, साहेबराव कवडे, बाळासाहेब गायकवाड, किशोर टोकसे, किरण कानवडे, केशव दिघे, शंकर ढमक, नवनाथ गडाख आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक घुगरकर यांनी केले. सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी आभार मानले.

Web Title: Efforts to bring Nilwande water through canals by 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.