शिक्षणाला आता ई-क्लस्टरची जोड!
By Admin | Updated: June 21, 2014 00:47 IST2014-06-20T23:40:05+5:302014-06-21T00:47:58+5:30
अहमदनगर : ग्रामीण भागातील मुलांना जगातील सर्वाेत्तम शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आनंदाने, हसत खेळत ज्ञान संपादन करता यावे, शाळेची माहिती, त्या ठिकाणी राबविण्यात येणारे
शिक्षणाला आता ई-क्लस्टरची जोड!
अहमदनगर : ग्रामीण भागातील मुलांना जगातील सर्वाेत्तम शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आनंदाने, हसत खेळत ज्ञान संपादन करता यावे, शाळेची माहिती, त्या ठिकाणी राबविण्यात येणारे उपक्रम इतरांना संगणकाच्या एका क्लीकवर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी शैक्षणिक ई-क्लस्टर तयार केले आहे. सुपा (ता. पारनेर) या ठिकाणी हे शैक्षणिक ई-क्लस्टर तयार करण्यात आले असून त्याद्वारे या १९ प्राथमिक शाळांची माहिती, त्यांचे वैविध्यपूर्ण प्रयोग जगाभरातून कोणालाही सहज पाहता येणे शक्य होेणार आहे. यासाठी क्लाउड तंत्रज्ञानाचा चपखल वापर करुन घेण्यात आला आहे. सुपा केंद्राचे प्रमुख नाना गायकवाड यांच्या कल्पनेतून हे ई-क्लस्टर, एज्यूकेशन क्लाऊड आणि जिज्ञासा गार्डन साकरले आहे. या उपक्रमात या केंद्रात येणाऱ्या १९ शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती, दररोज शाळेत हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळेत होणार परिपाठ आदी माहिती संकेतस्थळावर दररोज अपडेट होत आहे. या शिवाय डिजीटल स्कूल, जिज्ञासा प्रकल्प, परिसर भेट, स्वच्छता दिवस, जंगलवाचन, लॅगवेज लॉब, छंद वर्ग, विद्यार्थ्यांचे वाढदिवस, विविध गुणदर्शन आणि क्रीडा मेळावे यांची माहिती या ई-क्लस्टरच्या माध्यमातून एकमेकाला मिळू शकते. शालेय पोषण आहाराची माहिती आणि नोंदी ठेवणे सर्वात किचकट काम शिक्षकांना करावे लागते. मात्र, या ठिकाणी एक सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले असून त्यात विद्यार्थ्यांचा पट आणि विद्यार्थ्यांची उपस्थितीची माहिती टाकली असता, पोषण आहाराचे रेकॉर्ड तयार होते. या शिक्षण क्लस्टरमध्ये दैनंदिन, वार्ता आणि उपक्रमाची माहिती उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बसून शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधनेही आता शक्य आहे. या शैक्षणिक ई-क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी कौतुक केले आहे. त्याचे अनुकरण अन्य शाळांची करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी) शैक्षणिक ई-क्लस्टर हे सध्या फक्त सुपा केंद्रा पुरता मर्यादीत आहे. या प्रयोगाकडे पायलट प्रयोग म्हणून पाहता येईल. विशेष करून दुर्गम भागात असा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्हाभर राबविण्याचा विचार करता येईल. या ई-क्लस्टरच्या माध्यमातून विशेष करून शाळा एकमेकांना जोडून राहतील. -शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्हाभर... शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी सुपा केंद्राला भेट दिली. त्यांच्या हस्ते संगणकाची कळ दाबून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पारनेरचे गटशिक्षणाधिकारी आर. के .पटारे उपस्थित होते.