खरवंडी येथील शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:45+5:302021-06-02T04:17:45+5:30

यात संस्था अध्यक्ष गोरक्षनाथ कुर्हे, सचिव जयवंत लिपाणे, उपाध्यक्ष आबासाहेब फाटके, भरत फाटके, सुभाष शिंदे, बन्सीभाऊ म्हस्के, मंदाकिनी म्हस्के, ...

Education Institution office bearers at Kharwandi go on a hunger strike in front of Zilla Parishad | खरवंडी येथील शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

खरवंडी येथील शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

यात संस्था अध्यक्ष गोरक्षनाथ कुर्हे, सचिव जयवंत लिपाणे, उपाध्यक्ष आबासाहेब फाटके, भरत फाटके, सुभाष शिंदे, बन्सीभाऊ म्हस्के, मंदाकिनी म्हस्के, सुनीता लिपाणे, रमेश घुले, सुरेखा चिंधे, विक्रम म्हस्के आदी सहभागी झाले होते. समता शिक्षण प्रसारक मंडळाचे २ अनुदानित तर एक अंशत: अनुदानित विद्यालय कार्यरत आहेत. या तीन विद्यालयात दीड हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या जळके खुर्द येथील गुरुवर्य भास्करगिरी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापकास सन २०१९ पासून विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मुख्याध्यापक ऐवजी सहशिक्षक म्हणून काम पाहण्याचा आदेश दिला होता. १ जून २०१८ पासून संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष केशव थोरात यांनी कायद्याचे उल्लंघन करून पात्र अर्हता नसलेल्या ए.टी.डी.ए.एम सेवा कनिष्ठ शिक्षक नामदेव ससे यांना नेमणूक दिली.या प्रभारी पदास शिक्षणाधिकाऱ्यांनीही मान्यता दिली. यामुळे सेवा जेष्ठ शिक्षकावर अन्याय झाला. गैरमार्गाने कायद्याचे उल्लंघन करून तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी २८ मे २०२० रोजी ससे यांना नियमित मुख्याध्यापकाची मान्यता दिली.

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती कायदा १९७७ नियमावली १९८१ नियम १२ अनुसूची फ मधील

मार्गदर्शक तरतुदीनुसार सेवा कनिष्ठ शिक्षकास मुख्याध्यापक करणे बेकायदेशीर आहे. वरील बाबीची चौकशी करून संस्था हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

-----------

फोटो मेल

०१जिल्हा परिषद आंदोलन

नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक कामकाजात जिल्हा परिषद व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक अडसर आणत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी संस्था पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.

Web Title: Education Institution office bearers at Kharwandi go on a hunger strike in front of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.