‘सकाळ’चा संपादक बाळ बोठे हत्याकांडाचा सूत्रधार

By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:54+5:302020-12-05T04:36:54+5:30

आरोपींपैकी फिरोज व ज्ञानेश्वर या दोघांनी दुचाकी आडवी लावून जरे यांची कार अडवली व गळा चिरून त्यांची हत्या केली. ...

Editor of 'Sakal' Bal Bothe is the mastermind of the murder | ‘सकाळ’चा संपादक बाळ बोठे हत्याकांडाचा सूत्रधार

‘सकाळ’चा संपादक बाळ बोठे हत्याकांडाचा सूत्रधार

आरोपींपैकी फिरोज व ज्ञानेश्वर या दोघांनी दुचाकी आडवी लावून जरे यांची कार अडवली व गळा चिरून त्यांची हत्या केली. चोळके याने या दोघांना ही सुपारी दिली होती, तर चोळके याला बोठे व भिंगारदिवे यांनी सुपारी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी भिंगारदिवे याच्याकडून ६ लाख २० हजार रुपये जप्त केले आहेत.

...................

घटनेनंतर बोठे याने केली दिशाभूल

रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नगरच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. त्यावेळी संपादक बोठे बऱ्याच काळ स्वत: जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता. जरे यांचा लहान मुलगा व त्यांच्या आईचे तो सांत्वन करीत होता. पोलीस जरे यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेत असतानाही बोठे सावलीसारखा तेथेच उपस्थित होता. तो प्रत्येक माहितीकडे लक्ष ठेवत होता. तेव्हापासूनच बोठे याच्याबद्दल शंका निर्माण झाली होती.

...............

बोठेविरोधात सक्षम पुरावे

जरे हत्याकांडात बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे सक्षम पुरावे असून, त्याच्या अटकेनंतर यात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्येष्ठ संपादकच हत्येचा सूत्रधार निघाल्याने पोलीसही चक्रावून गेेले आहेत. अटकेत असलेल्या भिंगारदिवे याने या हत्याकांडामागील सर्व कारणे बोठे यालाच माहीत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे बोठे याचा पोलिसांकडून चौफेर शोध सुरू आहे.

...............

क्राइम रिपोर्टर ते खुनाचा सूत्रधार

बोठे हा पूर्वी स्वत: क्राइम रिपोर्टर होता. वकिलीच्या पदवीसोबतच त्याने पीएच.डी.ही मिळविलेली आहे. पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही त्याची नियुक्ती आहे. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तो समाजात वावरत होता. मात्र, आता तो खुनाचा मास्टरमाइंड म्हणून समोर आला आहे.

Web Title: Editor of 'Sakal' Bal Bothe is the mastermind of the murder