परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात सहायक निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भुजबळ मूळचे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावचे आहेत. त्यामुळे मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने तीन तास कसून चौकशी केली. पोलीस उपायुक्त भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहतात. मात्र, त्यांची शेतजमीन व नातेवाईक गावीच आहेत. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या गावाकडील घर आणि नातेवाइकांची माहिती मिळाल्याने पथकाने येथे येऊन चौकशी केली. भुजबळ यांच्या येथील नातेवाइकांचे जबाब नोंदवून ही पथके परत गेली.
सिंग यांनी केलेल्या आरोपात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळही हजर असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे भुजबळ यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या मूळ गावाची माहिती मिळाल्यानंतर हे पथक येथे आले.