नगर जिल्ह्याला पुन्हा कोरोनाचे ग्रहण, आणखी बारा जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 13:09 IST2020-06-21T13:09:17+5:302020-06-21T13:09:25+5:30
अहमदनगर : जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. दिवसेंदिवस हे ग्रहण सुटायची काही शक्यता दिसत नाही. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात बारा जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. संगमनेर तालुक्यातील ०७, पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित झाला आहे. एकाच दिवसाच बारा जण आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

नगर जिल्ह्याला पुन्हा कोरोनाचे ग्रहण, आणखी बारा जणांना कोरोनाची लागण
अहमदनगर : जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. दिवसेंदिवस हे ग्रहण सुटायची काही शक्यता दिसत नाही. रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात बारा जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. संगमनेर तालुक्यातील ०७, पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित झाला आहे. एकाच दिवसाच बारा जण आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील ४४ वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील ३८ वर्षीय महिला बाधित झाली आहे. दिल्ली नाका येथील ४२ वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील ६५ वर्षीय महिला आणि ३६ वर्षीय पुरुष, भारत नगर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील ३० वर्षीय पुरुष, भोयरे पठार येथील २८ वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे लागण झाली आहे.
नगर शहरातील झेंडीगेट येतील ५४ वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील ५८ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. अकोले तालुक्यातील कोतूळ येथील ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आठ जण घरी परतले
आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील ०८ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज मिळाला. कोरोनावर मात करून परतले घरी परतले आहे. नगर शहरातील ०४, राहाता येथील ०३ आणि संगमनेर येथील ०१ रुग्ण बरा. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४५ इतकी झाली आहे.