खा. लोखंडेंचे राज्य सरकारलाच आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:22 IST2021-03-31T04:22:29+5:302021-03-31T04:22:29+5:30
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन खंडित केल्याने संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि. ३०) खा. लोखंडे यांनी बैठक ...

खा. लोखंडेंचे राज्य सरकारलाच आव्हान
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन खंडित केल्याने संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि. ३०) खा. लोखंडे यांनी बैठक बोलविली होती. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, सदस्य अशोक सातपुते, आशा इल्हे आदी उपस्थित होते.
आठवड्यातून केवळ एकदा नळाला पाणी येते. त्यातही दूषित पाणीपुरवठा होतो. शहरातील सांडपाणी गटारीद्वारे नदीपात्रात सोडले जाते. पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन खराब झाली असून ती बदलावी, अशा अनेक समस्यांचा पाढा उपस्थितांनी खा. लोखंडे यांच्यासमोर वाचला. लोखंडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बैठकीतूनच फोन लावत खराब पाइप दुरुस्तीसाठी व फिल्ट्रेशन प्लांटला निधी देण्याची मागणी केली. ही मागणी पालकमंत्री मुश्रीफ यांनी मान्य केल्याचे लोखंडे यांनी सांगितले.