अहमदनगरमधील घारगावमध्ये भूकंप सदृश धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 11:41 IST2022-02-09T11:41:02+5:302022-02-09T11:41:35+5:30
Earthquake: संगमनेर तालुक्यातील घारगावसह कोठे बुद्रुक या गावांच्या परिसरात बुधवारी (९ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास भूगर्भातील हालचालींचे धक्के जाणवले.

अहमदनगरमधील घारगावमध्ये भूकंप सदृश धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील घारगावसह कोठे बुद्रुक या गावांच्या परिसरात बुधवारी (९ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास भूगर्भातील हालचालींचे धक्के जाणवले. यात धक्क्याची तीव्रता अधिक होती. नाशिक येथील मेरी केंद्रातील भूकंपमापन यंत्रावर यांची नोंद झालेली नाही.
बोटा व परिसरात गेल्या वर्षीही मार्च व एप्रिल महिन्यात भूकंपाचे धक्के बसले होते. त्यावेळी या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली नसल्याचे वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी 'लोकमत'ला सांगितले.