मोर्चासाठी आदल्या दिवशीच दशक्रियाविधी
By Admin | Updated: September 18, 2016 01:51 IST2016-09-18T01:49:49+5:302016-09-18T01:51:44+5:30
श्रीगोंदा : मराठा समाजाच्या मोर्चासाठी तालुक्यातील हिरडगाव येथील दरेकर कुटुंबियांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर करण्यात येणारा दशक्रिया विधी एक दिवस आधीच करण्याचा निर्णय घेतला

मोर्चासाठी आदल्या दिवशीच दशक्रियाविधी
श्रीगोंदा : नगर शहरात २३ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा समाजाच्या मोर्चासाठी तालुक्यातील हिरडगाव येथील दरेकर कुटुंबियांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर करण्यात येणारा दशक्रिया विधी एक दिवस आधीच करण्याचा निर्णय घेतला आहे़
जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थस्थापक विठ्ठल दरेकर यांचे वडील कोंडीबा भोलाजी दरेकर यांचे १४ सप्टेंबर रोजी निधन झाले़ त्यांचा दशक्रियाविधी २३ सप्टेंबर रोजी येतो़ मात्र, याच दिवशी नगरमध्ये मराठा मूक मोर्चा असल्याने दरेकर कुटुंबियांनी दशक्रियाविधी एक दिवस आधीच म्हणजे २२ सप्टेंबर रोजी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ २३ सप्टेंबरच्या मोर्चात नातेवाईकांसह सर्वांना जाता यावे तसेच मोर्चाला जाणाऱ्या मराठा बांधवांची अडचण होऊ नये, यासाठी दरेकर कुटुुंबियांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे़ दरेकर कुटुंबियांच्या या निर्णयाचे श्रीगोंदा तालुक्यातील मराठा बांधवांनी स्वागत केले आहे़