नाशिक-पुणे महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:21 IST2019-01-04T13:20:49+5:302019-01-04T13:21:14+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास नाशिक - पुणे महामार्गावरील डोळासने शिवारातील एकल घाटात घडली

नाशिक-पुणे महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
घारगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास नाशिक - पुणे महामार्गावरील डोळासने शिवारातील एकल घाटात घडली. रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या बिबट्याला वाहनाची जोरदार ठोकर लागली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
संगमनेर तालुक्याच्या डोळासणे हद्दीतील एकल घाटात गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी भरधाव वाहनाने बिबट्याला जोराची धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. महामार्गाने प्रवास करणा-या घारगाव येथील शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या काही सदस्यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी ताबडतोब घारगाव पोलीस व वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनखात्याचे कर्मचारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला.