आगीत १२ एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST2021-03-13T04:38:06+5:302021-03-13T04:38:06+5:30
आग लागल्याचे निदर्शनास येताच अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला. त्या बंबाद्वारे ही आग ...

आगीत १२ एकर ऊस खाक
आग लागल्याचे निदर्शनास येताच अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक बंब पाचारण करण्यात आला. त्या बंबाद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या आगीची तीव्रताही प्रचंड असल्याने सुमारे १० ते १२ एकर ऊस या आगीने आपल्या कवेत घेतला आणि जळून खाक झाला. यामध्ये काही एकर ऊस हा तोडणीच्या प्रतीक्षेत होता तर काही सहा महिन्यांचा होता. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत.
विराज रामनाथ शिंदे, सुनील गंगाधर देशमुख, रमेश गंगाधर देशमुख, अशोक त्र्यंबक देशमुख, नारायण शांताराम देशमुख, नितेश तान्हाजी देशमुख, विजय पंढरीनाथ देशमुख, विलास निवृत्ती देशमुख आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
११ आग