अमावस्येनिमित्त शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 10:59 IST2018-08-11T10:59:09+5:302018-08-11T10:59:17+5:30

शनी अमावस्येनिम्मित शनी शिंगणापूर येथे भरलेल्या यात्रेला शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी शनी मूर्तीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

During the celebration of the new moon, | अमावस्येनिमित्त शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची मांदियाळी

अमावस्येनिमित्त शनिशिंगणापूरमध्ये भाविकांची मांदियाळी

नेवासा : शनी अमावस्येनिम्मित शनी शिंगणापूर येथे भरलेल्या यात्रेला शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी शनी मूर्तीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे डॉ.राहुल हेगडे, खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त जयेश शाह, पी.डी.पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झालेली अमावस्या शनिवारी सायंकाळपर्यंत आहे. भाविकांच्या गर्दीने दर्शनपथ भरले गेले.
आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. मुख्य मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहनांसाठी वाहनतळ करण्यात आले आहे. देवस्थानच्या वतीने वाहनतळ, पिण्याचे पाणी, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे चौथ-यावरील दर्शन बंद करण्यात आले होते. शिंगणापूर येथील रस्ते गर्दीने फुलून गेले आहे. शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: During the celebration of the new moon,