विहीरीतील सापाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:19 IST2018-08-24T16:19:25+5:302018-08-24T16:19:34+5:30

संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारातील एका विहिरीतील सापाला जीवदान दिले. सर्पमित्र दत्ता गाडेकर यांनी गुरुवारी दुपारी एका नागाला सुरक्षित बाहेर काढले.

Due to the extinction of the forgotten snake | विहीरीतील सापाला दिले जीवदान

विहीरीतील सापाला दिले जीवदान

घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारातील एका विहिरीतील सापाला जीवदान दिले. सर्पमित्र दत्ता गाडेकर यांनी गुरुवारी दुपारी एका नागाला सुरक्षित बाहेर काढले.
घारगाव शिवारातील ग्रामपंचायतीच्या विहिरीत एक नाग येथील तरुणांना आढळून आला. सर्पमित्र दत्ता गाडेकर यांनी दोर, पोते व अन्य साहित्य वापरून अडीच तास परिश्रम घेत नागाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले. या नागाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आल्याचे सर्पमित्र गाडेकर यांनी सांगितले. या नागाला बाहेर काढण्यासाठी नितीन आहेर, संकेत खोल्लम, शंभू आहेर, दर्शन जाधव, सिद्धेश काळे, सलमान शेख यांसह अनेक ग्रामस्थांनी मदत केली.

Web Title: Due to the extinction of the forgotten snake