शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुष्काळामुळे ऊस तोडणी मजूर दीडपटीने वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 11:07 IST

दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे.

उमेश कुलकर्णीपाथर्डी : दुष्काळी स्थितीने हैराण.. पोटाच्या खळगीचा प्रश्न.. जनावरांच्या चाऱ्याची चिंता.. मजुरी वाढीसाठी नेतेपातळीवर सुरू असलेला संप.. अशा परिस्थितीत ऊस तोडणी मजुरांनी अखेर कारखान्यांचा रस्ता धरला आहे. दुष्काळामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत ऊस तोडणीसाठी जाणा-या मजुरांची संख्या दीड पटीने वाढली आहे.पाथर्डी तालुका हा दुष्काळी म्हणून राज्याला परिचित आहे. खरिपाची पिके हातात घेतल्यानंतर दसरा घरी साजरा करून तालुक्यातील सुमारे ४० ते ५० हजार मजूर दरवर्षी तोडणीसाठी राज्यातील तसेच परराज्यातील कारखान्यावर जातात. परंतु यंदा निसर्गराजा कोपल्याने खरीप आणि रब्बीही गेले. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाºयाची स्थिती अत्यंत बिकट आहे. गावाकडे राहून करायचे काय? जगायचे कसे? या चिंतेने येथील मजूर ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडे निघाले आहेत. तोडणी कामगारांच्या मजुरीत, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, यासाठी संप पुकारलेला आहे. परंतु भाव वाढ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्या मिळते ते पदरात पाडून घेण्यासाठी मजूर कारखान्याकडे रवाना होत आहेत. दरवर्षी मुकादम मजुरांकडे जाऊन कारखान्यावर जाण्यासाठी प्रयत्न करत. यावर्षी ‘मिळेल त्या उचलीवर’ मजूर कारखान्यावर जायला तयार झाला आहे. ‘काही मजूर तर आम्हाला घेऊन जा’ असे म्हणत मुकादमांकडे विनवणी करीत असल्याचे चित्र आहे.नेते पातळीवर तोडणी कामगारांचा संप सुरू असला तरी याबाबत मात्र कोणताही नेता काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे पुढच्या दिवसांची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे मजूर संसाराला लागणाºया चीज वस्तूंची एखादी पेटी, लहान बापडे, अंगावर फाटकी चादर, काही मात्र ट्रॅक्टरवर उघड्यावर बसून जनावरांना घेऊन जात असल्याचे चित्र दिसते. तोडणी कामगारांची ही बि-हाडं डांबरी रस्त्यावरून तळपत्या उन्हात कारखान्याकडे निघाली आहेत.अकोले (ता.पाथर्डी) येथील ऊस तोडणी मजूर वर्षा गिरी म्हणाल्या, चालूवर्षी फारच बेकार दिवस आले आहेत. गावाकडे कसे जगायचे हा प्रश्न आहे. आम्हालाच खायला नाही, तर जनावरांना कोठून आणणार, प्यायलाही काही दिवसांनी पाणी राहणार नाही. कारखान्यावर जाऊन कसे तरी सहा महिने काढू, असे त्यांनी सांगितले.मजूर कारखान्यावर गेल्याने गावामध्ये वृद्ध, शाळकरी मुले राहतात. त्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागणार आहे. सध्या वीस ते तीस टक्के मजूर कारखान्यावर गेले आहेत.ऊसतोड मजुरी वाढीबाबत साशंकता..ऊसतोड मजूर, मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, यासाठी विविध संघटनांनी संप पुकारलेला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाववाढ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे तालुक्यातील खरवंडी येथील मेळाव्यात जाहीर केले होते. परंतु त्यानंतर सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मुंडे यांनी मजुरांच्या हातातील कोयता खाली घेण्यासाठी झटणार असल्याचे जाहीर केले. परंतु मजूर व मुकादमांच्या कमिशन वाढीबाबत चकार शब्द काढला नसल्याने भाववाढीचे काय होणार असा प्रश्न मजुरांसमोर आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी