दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:09+5:302021-07-14T04:25:09+5:30
अमृत उद्योगसमूह व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ११) तालुक्यातील वडगाव पान येथील पद्मावती डोंगरावर वृक्षारोपण ...

दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली
अमृत उद्योगसमूह व जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ११) तालुक्यातील वडगाव पान येथील पद्मावती डोंगरावर वृक्षारोपण करून १६व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रकल्पप्रमुख, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, महानंदाचे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा शेटे, सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, लक्ष्मणराव कुटे, संतोष हासे, बेबी थोरात, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, हौशीराम सोनवणे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून सोळा वर्षांपूर्वी हे अभियान सुरू केले. या अभियानात तालुक्यातील सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला. संगमनेर येथून सुरू झालेली वृक्षसंवर्धन संस्कृती राज्याला दिशादर्शक ठरली आहे. दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षी लाखो वृक्षांचे रोपण होत असल्याने १६ वर्षांपूर्वीचा तालुका व आत्ताचा तालुका यामध्ये खूप फरक झाला आहे. तालुक्यामध्ये वृक्षांची संख्या वाढली आहे.
भाऊसाहेब कुटे, मधुकर गुंजाळ, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, पद्मा थोरात, बाळासाहेब गायकवाड, प्रा. भाऊसाहेब शिंदे, सुनीता अभंग आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. बाळासाहेब उंबरकर यांनी आभार मानले.