मध्यधुंद कारचालकाने उडवले रिक्षाचालकाला; दोन जण गंभीर जखमी
By सुदाम देशमुख | Updated: May 1, 2025 06:09 IST2025-05-01T06:08:46+5:302025-05-01T06:09:14+5:30
ही घटना रात्री अकराच्या सुमारास सावेडी परिसरातील नगर मनमाड रोडवरील पत्रकार चौकात जवळ घडली.

मध्यधुंद कारचालकाने उडवले रिक्षाचालकाला; दोन जण गंभीर जखमी
अहिल्यानगर: शहरातील नगर मनमाड रोडवर डीएसपी चौकाकडून शिर्डीकडे जाणाऱ्या एका कार चालकाने आधी दुचाकी वरील महिला व मुलाला तर नंतर एका रिक्षाचालकाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षाचालक व दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान संतप्त तरुणांनी कारवार दगडफेक केली.
ही घटना रात्री अकराच्या सुमारास सावेडी परिसरातील नगर मनमाड रोडवरील पत्रकार चौकात जवळ घडली.
यावेळी घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी कार चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले तर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान कारचालकाने आपले नाव सांगण्यास नकार दिला. दरम्यान प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की सदर कारचालक हा डीएसपी चौकाकडून शिर्डी कडे जात असताना त्याने अनेक वाहनांना धडक दिली. तसेच हा नशेत असल्याचे सांगितले.
अनेक ठिकाणी धडक दिल्याने कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. रिक्षाचेही मोठे नुकसान झाले.