गुन्हेगारीच्या मुळाशी नशेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 13:37 IST2017-09-01T13:35:22+5:302017-09-01T13:37:36+5:30

दोन दिवसांपूर्वी दत्तनगर येथे दरोडा टाकून बाभळेश्वर रस्त्यावर लुटमार करून पोलिसांवर हल्ला केलेले गुन्हेगार नशेत धुंद होते. चोवीस तासानंतरही अटक केलेल्या आरोपींची नशा उतरली नव्हती. गुन्हेगारीच्या मुळाशी नशाबाजी आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नशेची केंद्रे उद्ध्वस्त केली जातील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुरूवारी रात्री येथे सांगितले.  

Drug abuse at the root of crime | गुन्हेगारीच्या मुळाशी नशेबाजी

गुन्हेगारीच्या मुळाशी नशेबाजी

ठळक मुद्देरंजनकुमार शर्मानशेची केंद्रे उद्ध्वस्त करणार

श्रीरामपूर : दोन दिवसांपूर्वी दत्तनगर येथे दरोडा टाकून बाभळेश्वर रस्त्यावर लुटमार करून पोलिसांवर हल्ला केलेले गुन्हेगार नशेत धुंद होते. चोवीस तासानंतरही अटक केलेल्या आरोपींची नशा उतरली नव्हती. गुन्हेगारीच्या मुळाशी नशाबाजी आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नशेची केंद्रे उद्ध्वस्त केली जातील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुरूवारी रात्री येथे सांगितले.  
शहरातील आझाद मैदानावरील मानाच्या गणपतीची आरती त्यांच्याहस्ते झाली. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, सिद्धार्थ मुरकुटे उपस्थित होते. मनोज नवले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
शर्मा म्हणाले, विघ्नहर्त्याची मिरवणूक करताना डिजे लावून, सामाजिक द्वेष पसरविणारी गाणी वाजवून मंडळांनी विघ्न निर्माण करू नये. मंडळांनी सामाजिक हिताचे उपक्रम राबविल्यास जिल्हा प्रशासनाकडून त्याला प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येईल. या उपक्रमात मंडळांनी सहभागी व्हावे. 
 

Web Title: Drug abuse at the root of crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.