हिवरे बाजारची दुष्काळमुक्ती देशाला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:58+5:302021-06-21T04:15:58+5:30
निंबळक : हिवरे बाजारची दुष्काळमुक्ती देशासाठी प्रेरणादायी आहे. येथील दुष्काळमुक्तीचा संदेश तरुणाईने घेतल्यास मोठी चळवळ निर्माण होईल, असे प्रतिपादन ...

हिवरे बाजारची दुष्काळमुक्ती देशाला प्रेरणादायी
निंबळक : हिवरे बाजारची दुष्काळमुक्ती देशासाठी प्रेरणादायी आहे. येथील दुष्काळमुक्तीचा संदेश तरुणाईने घेतल्यास मोठी चळवळ निर्माण होईल, असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.
हिवरे बाजार (ता. नगर) येथे खोत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी खोत म्हणाले, हिवरे बाजार गाव दुष्काळमुक्त आहे. हिरवळीने नटलेले आहे. व्यसनमुक्त, विकासाभिमुख गाव जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरावा, असा गाव एक तपस्वीच करू शकतो. हे पाहिल्यानंतर गावाला समृद्ध करणारे पोपटराव पवार यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेरणेतून गाव समृद्ध करण्यासाठी लाखो युवक तयार होतील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी खोत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी खोत यांना गावात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. ग्रामस्थांतर्फे खोत यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी एस. टी. पादीर, रो. ना. पादीर, ग्रामस्थ उपस्थित होते.
----
२० हिवरे बाजार
हिवरे बाजार येथे सदाभाऊ खोत यांना विविध प्रयोगांची माहिती देताना पद्मश्री पोपटराव पवार.