कोठला येथे ट्रक अडवित वाहन चालकांना नगरमध्ये काळे फसले
By अण्णा नवथर | Updated: January 11, 2024 17:52 IST2024-01-11T17:52:07+5:302024-01-11T17:52:41+5:30
वाहन चालक संघटनेच्या कार्यकत्यांनी गुरुवारी कोठला येथून जाणाऱ्या ट्रक अडविल्या.

कोठला येथे ट्रक अडवित वाहन चालकांना नगरमध्ये काळे फसले
अण्णा नवथर, अहमदनगर: हिट ॲण्ड रल कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरू असून, आंदोलनकांनी गुरुवारी कोठला येथे ट्रक अडवित चालकांना काळे फसले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
हिट ॲण्ड रन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी अहमदनगर वाहन चालक संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. असे असताना नगर शहरातून गुरुवारी ट्रक जात असल्याचे संघटनेच्या लक्षात आले. वाहन चालक संघटनेच्या कार्यकत्यांनी गुरुवारी कोठला येथून जाणाऱ्या ट्रक अडविल्या.
तसेच आंदोलन सुरू असताना ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकांचा चांगलाच समाचार घेतला. काहींना खाली उतरवून घेत चपलांचा हार घालून काळे फसवण्यात आले. त्यामुळे चौकात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरमम्यान तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधूकर साळवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.