शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटार योजनेला राज्य सरकारची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:34 IST

अहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या संपूर्ण शहराच्या भुयारी गटार योजनेच्या प्रकल्प आराखड्याला अखेर राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. एकूण ३२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १३६ कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी पुरवठा विभागाने केलेले बिनचूक सादरीकरण आणि हरित लवादाच्या दट्ट्यामुळे राज्य शासनालाही तत्काळ प्रकल्पाला मंजुरी द्यावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेला निविदा प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या संपूर्ण शहराच्या भुयारी गटार योजनेच्या प्रकल्प आराखड्याला अखेर राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. एकूण ३२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १३६ कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी पुरवठा विभागाने केलेले बिनचूक सादरीकरण आणि हरित लवादाच्या दट्ट्यामुळे राज्य शासनालाही तत्काळ प्रकल्पाला मंजुरी द्यावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेला निविदा प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.अमृत (अटल मिशन) योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प व भुयारी गटार योजनेचा प्रकल्प विकास आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एका खासगी संस्थेमार्फत तयार करून तो राज्य शासनाला सादर केला होता. या आराखड्याचे गुरुवारी मंत्रालयात सादरीकरण झाले. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिन मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य तांत्रिक मान्यता समितीची (स्टेट लेवल टेक्निकल कमिटी) बैठक झाली. या बैठकीला राज्यातील नऊ महापालिकांनी त्यांचे प्रकल्पाचे सादरीकरण केले. पहिला क्रमांक अहमदनगर महापालिकेचा होता. आयुक्त घनश्याम मंगळे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महादेव काकडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता अहिरे यांची या बैठकीला उपस्थिती होती. प्रकल्पाच्या सादरीकरणामध्ये डेमो दाखविण्यात आला. प्रकल्पाचा नकाशा, क्षेत्रनिहाय सादरीकरण करण्यात आले. समितीच्या प्रत्येक प्रश्नाला अभियंत्यांनी अचूक उत्तरे दिली. त्यामुळे समितीचे समाधान होऊन प्रकल्पाला मान्यता मिळाली. भुयारी गटार योजनेच्या संपूर्ण ३२० कोटीच्या आराखड्यालाच तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. सादरीकरणानंतर पहिल्या टप्प्यात १३६ कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. राज्य समितीने मान्यता दिल्यानंतर हा आराखडा केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी १३६ कोटीच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यास समितीने हिरवा कंदील दाखविला आहे.सीना नदी प्रदूषणाबाबत हरित लवादाकडे याचिका दाखल असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. हरित लवादाने वारंवार दिलेल्या आदेशाने मलनिस्सारण प्रकल्पाबाबत महापालिकेला तयारी करावी लागली. नदी प्रदूषणमुक्त करण्याचे सरकारचे धोरण असल्याने समितीनेही नगरच्या प्रकल्पाला मान्यता दिली. ----------------------