शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणातून २२०० क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग; डिग्रस, मानोरी बंधारा भरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 16:41 IST

 राहुरी : गेल्या पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाचा मुक्काम आहे. या पावसाने कोतूळ येथून ७७५ क्युसेकने पाण्याचे आवक सुरू आहे़. त्यामुळे मुळा नदीपात्रात असलेले बंधारे लवकर भरावेत म्हणून धरणातून पाण्याचे आवर्तन ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आले होते़. बुधवारी दुपारी नदीपात्रात असलेला मानोरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या बंधा-यातून पाणी मांजरी बंधा-याच्या दिशेने झेपावले आहे़.

 राहुरी : गेल्या पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाचा मुक्काम आहे. या पावसाने कोतूळ येथून ७७५ क्युसेकने पाण्याचे आवक सुरू आहे़. त्यामुळे मुळा नदीपात्रात असलेले बंधारे लवकर भरावेत म्हणून धरणातून पाण्याचे आवर्तन ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आले होते़. बुधवारी दुपारी नदीपात्रात असलेला मानोरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या बंधा-यातून पाणी मांजरी बंधा-याच्या दिशेने झेपावले आहे़.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती़. त्यामुळे पाण्याची आवक ५०० क्युसेकवरून ७७५ क्युसेकवर वाढली़. मुळा धरण पुन्हा परवा १०० टक्के भरले़. मुळा धरणात २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे़. कोतूळ बरोबरच पारनेर भागातील पाणीही धरणाकडे येत आहे़. मात्र कोतुळप्रमाणे पारनेर तालुक्यातून येणा-या पाण्याचे मोजमाप होत नाही़.मुळा नदीपात्रात असलेला डिग्रस बंधारा परवाच पूर्ण क्षमतेने भरण्यात आला़. याशिवाय मानोरी येथील बंधारे तत्परतेने भरावेत म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आला होता़. ११ मो-यातून प्रत्येकी २०० क्युसकने पाण्याचा विसर्ग सुरू होता़. मंगळवारी रात्री १ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता़. दुपारी १ वाजेनंतर विसर्ग पूवर्वत ११०० करण्यात आला आहे़.

मुळा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर कोणत्याही बंधा-याला धोका नाही़. मानोरी बंधारा ओव्हरप्लो झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे़. पाणी मांजरी  बंधा-याच्या दिशेने जात आहे़. मांजरी येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा भरल्यानंतर त्याखाली असलेला वांजुळपोई बंधारा पाण्याने भरण्यात येणार आहे़. बंधा-यांमध्ये फळ्या टाकण्यात आलेल्या आहेत़. बंधारे भरल्यानंतर पाणी फळ्यावरून नदीपात्रात जाते़. १० हजार क्युसेकने पाणी सोडले तरी बंधा-याला धोका नाही़.-अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण, अभियंता.

टॅग्स :WaterपाणीDamधरण