अहमदनगरमधील काष्टी शिवारात विलासपूर एक्स्प्रेसवर दरोडयाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 09:20 IST2017-10-28T09:20:29+5:302017-10-28T09:20:35+5:30
अहमदनगर : दौंड मनमाड लोहमार्गावरील काष्टी रेल्वे स्थानकात थांबलेल्या पुणे-विलासपूर एक्स्प्रेसमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करत त्यांच्याकडील रोखरक्कम- सोने-दागिने ...

अहमदनगरमधील काष्टी शिवारात विलासपूर एक्स्प्रेसवर दरोडयाचा प्रयत्न
अहमदनगर : दौंड मनमाड लोहमार्गावरील काष्टी रेल्वे स्थानकात थांबलेल्या पुणे-विलासपूर एक्स्प्रेसमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करत त्यांच्याकडील रोखरक्कम- सोने-दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांची मोठी लूट होता-होता टळली. ही घटना शुकवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-विलासपूर ही एक्स्प्रेस सिग्नल नसल्याने काष्टी रेल्वे स्टेशनवर थांबली असताना परिसरातील दरोडेखोर दरवाजे उघडून प्रवासी बोगीमध्ये घुसखोरी केली. यावेळी त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांमध्ये दहशत निर्माण केली आणि त्यांचे दागिने- रोकड लुटण्याचा प्रयत्न केला.
याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीनं श्रीगोंदा पोलिसांना संपर्क केला व घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली काष्टी रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले, मात्र सिग्नल मिळाल्याने एक्स्प्रेस स्टेशनपासून दोन किलोमीटर पुढे गेली. पोलीस येत असल्याची माहिती मिळताच दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमधील साखळी ओढली आणि अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.