सुजय विखेंची 'गांधीगिरी'; दिलीप गांधींना भेटून करणार मनधरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 14:27 IST2019-03-14T13:32:50+5:302019-03-14T14:27:23+5:30
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ.सुजय विखे पहिल्यांदाच नगरमध्ये आज दाखल झाले आहेत.

सुजय विखेंची 'गांधीगिरी'; दिलीप गांधींना भेटून करणार मनधरणी
अहमदनगर : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ.सुजय विखे पहिल्यांदाच नगरमध्ये आज दाखल झाले आहेत.
विखे यांनी भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून तसा निरोपही गांधी यांना पाठविला आहे. विखे यांनी गांधी यांना भेटीची वेळ मागितली आहे. खासदार गांधी विखे यांना भेट देणार का याबाबत अद्याप चित्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
विखे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई येथून हेलिकाँप्टरने विळद घाटात दाखल झाले. त्यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान ते शहरातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचीही भेट घेणार आहेत.दरम्यान दिलीप गांधी दिल्लीला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.