जामखेड शहरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:45+5:302020-12-07T04:15:45+5:30

जामखेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज मंदिर, सिद्धार्थनगर, मिलिंदनगर व सदाफुले वस्तीसह शहरातील विविध ठिकाणी ...

Dr. Jamkhed in various places in the city. Greetings to Babasaheb Ambedkar | जामखेड शहरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जामखेड शहरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जामखेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

समाज मंदिर, सिद्धार्थनगर, मिलिंदनगर व सदाफुले वस्तीसह शहरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रा. विकी घायतडक, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, दीपक सदाफुले, हरिभाऊ कदम, विशाल अब्दुले, राजू सदाफुले, अनिल सदाफुले, दादा घायतडक, बापूसाहेब गायकवाड, शैलेश सदाफुले, सुरेखा सदाफुले, अनिल सदाफुले, गौरव सदाफुले, राजू घायतडक, प्रीतम घायतडक आदी उपस्थित होते.

शहरातील सिद्धार्थनगरमध्ये पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते तैलचित्रास अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुरेश सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, दीपक सदाफुले, शेखर घायतडक उपस्थित होते. मिलिंदनगर येथे अशोक आव्हाड, संदेश घायतडक, राहुल आहेर, अमोल सदाफुले, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Jamkhed in various places in the city. Greetings to Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.