डॉ. महेश गाेलेकर यांचा खर्डा येथे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:00+5:302021-04-02T04:21:00+5:30
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. महेश गोलेकर यांना बीड ...

डॉ. महेश गाेलेकर यांचा खर्डा येथे सन्मान
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. महेश गोलेकर यांना बीड सिटी रोटरी क्लबने उल्लेखनीय सेवाकार्य केल्याबद्दल सन्मानित केले. या पुरस्कारबद्दल त्यांचा खर्डा येथील श्री गजानन महाविद्यालय व श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. यावेळी श्री गजानन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव व श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण घोडके यांनी त्यांचा सन्मान केला. डॉ. गोलेकर म्हणाले, मानवसेवा हीच ईश्वरसेवा असून, फळाची अपेक्षा न करता सेवा करावी. परमेश्वर आपल्या कार्याची अवश्य दखल घेतो. यावेळी विद्यालय समितीचे विजयसिंह गोलेकर, दत्तराज पवार, विवेक योगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.