डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाच्या इतिहासात मोठे स्थान
By | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:57+5:302020-12-07T04:14:57+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे व संगमनेर शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाच्या इतिहासात मोठे स्थान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे व संगमनेर शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, माणिक यादव, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक थोर राष्ट्रपुरुषांनी योगदान दिले. अनेकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञ व तत्त्वज्ञ होते. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र देताना समाजातील प्रत्येकासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून शिक्षणातूनच प्रगती होते आहे. याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांचे विचार तरुण पिढीने अखंडपणे पुढे नेण्याची गरज आहे,असे ते म्हणाले.