अहमदनगर: सरकारच्या आॅनलाईन सेवेचा शहरी व ग्रामीण भागात बोजवारा उडाला आहे़ गेल्या दोन दिवसांपासून आपले सरकार पोर्टल डाऊन आहे़ त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अडथळे येत असून, शेतीची कामे सोडून महाईसेवा केंद्रातच मुक्काम ठोकण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे़ सरकारने छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे़ कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्यास अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे़ जिल्ह्यातून सुमारे ५ लाख अर्ज दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहेत़ त्यापैकी ५० ते ६० टक्के अर्ज अत्तापर्यंत दाखल झाले आहेत़ अर्ज दाखल करण्यासाठी पंधरा दिवस उरले आहेत़ त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बाहेर पडले आहेत़ कर्जमाफीचा, अधारकार्ड आणि बँक पास बुक घेवून शेतकरी आॅनलाईन माहिती भरण्यासाठी महाईसेवा केंद्राचा रस्ता धरतात़ परंतु, त्यांना सर्व्हर डाऊन आहे, उद्या या, असे सांगितले जाते़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच महाईसेवा केंद्रांतील सेवा ठप्प झाल्या आहेत़ शेतकºयांचा आधार क्रमांक आणि त्यांच्या बोटाचे ठसे, जुळत नाहीत़ त्यामुळे आपले सरकार पोर्टलवर ही माहिती अपलोड होणे तर दूरचे़ पण ते ओपन होत नसल्याचे कें्रद चालकांचे म्हणने आहे़कालावधी कमी राहिल्याने केंद्रांवरील गर्दी वाढू लागली आहे़ पण, शहरी व ग्रामीण भागात आपले सरकार पोर्टल सुरू होताना दिसत नाही़ ते कधी उपलब्ध होईल, याची खात्री कोण देणार, याबाबतही प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही माहिती शेतक-यांना दिली जात नाही़ त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस आले आहेत़ दिवसभरात एकही अर्ज भरला जात नाही़ त्यामुळे नगर शहरातील केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत शेतक-यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात़ आपले सरकार पोर्टल ठप्प असल्याने महाईसेवा केंद्र चालकांनी अर्ज घेणे बंद केले आहे़ पोर्टल कधी सुरू होईल, याचाही नेम नाही़ त्यामुळे तेही अर्ज घेत नाहीत़ अर्ज घेवून पतीपत्नी दोघे सोबत या, असे त्यांच्याकडून सांगितले जाते़ केंद्रावर पोहोचल्यानंतर पुन्हा तेच उत्तर सर्व्हर डाऊन, अशी स्थिती शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून आहे़ ़
कर्जमाफीचे सर्व्हर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:26 IST
सरकारच्या आॅनलाईन सेवेचा शहरी व ग्रामीण भागात बोजवारा उडाला आहे़ गेल्या दोन दिवसांपासून आपले सरकार पोर्टल डाऊन आहे़ त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अडथळे येत असून, शेतीची कामे सोडून महाईसेवा केंद्रातच मुक्काम ठोकण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे़
कर्जमाफीचे सर्व्हर डाऊन
ठळक मुद्देदोन दिवसांपासून सेवा ठप्प५० टक्के अर्जांचे संगणकीकरणशेतक-यांचा केंद्रात मुक्काम