नतमस्तक होण्यास लाजू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 10:53 IST2019-10-02T10:51:12+5:302019-10-02T10:53:38+5:30
गरजवंत व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार मदत करणे ही देखील सेवावृत्तीच आहे. दुस-याला धर्म आराधनेकरीता तयार करणे हा एक सेवाभाव आहे. संत, महापुरुष हे समाजाचे रक्षक असतात म्हणून त्यांच्या संदेशानुसार वागले पाहिजे. संतांमध्ये सेवावृत्ती कायम असते. समाजाचे प्रबोधन करुन त्याला धर्माविषयी जागृत करण्याचे कार्य संतांकरवी होते.

नतमस्तक होण्यास लाजू नका
सन्मतीवाणी
गरजवंत व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार मदत करणे ही देखील सेवावृत्तीच आहे. दुस-याला धर्म आराधनेकरीता तयार करणे हा एक सेवाभाव आहे. संत, महापुरुष हे समाजाचे रक्षक असतात म्हणून त्यांच्या संदेशानुसार वागले पाहिजे. संतांमध्ये सेवावृत्ती कायम असते. समाजाचे प्रबोधन करुन त्याला धर्माविषयी जागृत करण्याचे कार्य संतांकरवी होते.
जीनशासनचा अभ्यास करुन नवपद आराधना करणे ही धर्म आराधना आहे. आयंबील केल्यावर रोज एक एक पद आराधना करावी. कर्माची निर्जरा केली पाहिजे तरच तीर्थधर्माचा अवलंब होतो. आपली पापकर्मे नष्ट करावयाची असतील तर भक्ती करावी लागते. नमोकार मंत्रात नऊ रंगाचे महत्व सांगितले आहे. नवकार मंत्रामध्ये रोग्याला रोगापासून मुक्त करण्याची ताकद आहे. जे लोक आराधना करतात ते भाग्यवंत समजले पाहिजेत. धर्माबद्दल श्रध्दा भाव ठेवण्याची आवश्यकता आहे. संतांपुढे भर रस्त्यात सुध्दा नतमस्तक होण्यास कधीही लाजू नये. धर्मस्थानकात कधीही कोणाचीही निंदा करु नये. जीनवाणी ऐकली तर प्रत्येकाच्या जीवनात निश्चितच चांगले बदल घडून येतात. धर्माचा आधार घेऊनच जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी जीवन जगल्याचा आनंद मिळेल.
- पू. श्री. सन्मती महाराज