निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST2021-08-15T04:24:11+5:302021-08-15T04:24:11+5:30
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी (दि. १४) कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या ...

निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा नको
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी (दि. १४) कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा शेटे, सदस्य सीताराम राऊत, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, भाऊसाहेब कुटे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, माजी सभापती नीशा कोकणे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये अनेक जवळच्या नातलग व मित्र मंडळींना आपल्याला गमवावे लागले. निर्बंध काहीसे शिथिल झाल्यानंतर नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून तो अत्यंत धोकादायक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून युरोपमध्ये डेल्टाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हा प्रादुर्भाव आपल्याकडेही वाढू शकतो म्हणून प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. गावनिहाय दक्षता समिती अधिक प्रभावीपणे कार्यरत करून ‘कोरोनामुक्त गाव’ हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवा. लसीकरणाचा वेगही वाढवण्यात यावा, तसेच संगमनेर तालुका संपूर्णपणे कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.