आरोग्य यंत्रणेला शंभर पीपीई किटची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:39+5:302021-04-30T04:25:39+5:30
राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वासुदेव फर्निचरचे संचालक उद्योजक मेघराज बजाज यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शंभर ...

आरोग्य यंत्रणेला शंभर पीपीई किटची भेट
राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वासुदेव फर्निचरचे संचालक उद्योजक मेघराज बजाज यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास शंभर पीपीई किट व मास्क वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे यांच्याकडे सुपूर्द केले.
बजाज यांच्या उपक्रमाचे प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी स्वागत केले. यावेळी मेघराज बजाज म्हणाले, सध्या फक्त आरोग्य मंदिरे उघडी आहेत. या मंदिरांना मदत करा. नक्कीच त्याचे चांगले फळ मिळेल.
यावेळी राजू साखरे, सतीश दानवले, कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजूम सय्यद, वसीम हसमी, विलास गरजे, विशाल भैसडे, कांता सोनवणे, मोमीन आदी उपस्थित होते.
यावेळी दूरसंचार अधिकारी लिंबाजी साळवे यांनीही सॅनिटायझरचे वाटप केले.
----
२८राशीन कोविड
राशीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास पीपीई किट व मास्क देताना उद्योजक मेघराज बजाज, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे, डॉ. अंजूम सय्यद.