राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 12:51 IST2021-01-18T12:49:55+5:302021-01-18T12:51:21+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत लाभेष औटी व जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दत्ता आवारी गटाने वर्चस्व मिळविले.

Dominance of Auti-Mapari in Ralegan Siddhi | राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व

राळेगणसिध्दीत औटी-मापारींचे वर्चस्व

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत लाभेष औटी व जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दत्ता आवारी गटाने वर्चस्व मिळविले.

राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. सात जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. यात औटी-मापारी यांच्या राळेगणसिध्दी ग्रामविकास पॅनलने ५ जागांवर विजय मिळविला आहे. दोन जागांचा निकाल येणे बाकी आहे. विरोधी शामबाबा पॅनलला हाती आलेल्या निकालानुसार एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. 

राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत सुरूवातीला बिनविरोधचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे लाभेष औटी व जयसिंग मापारी हे एकत्र आले. ते एकत्र आल्यानंतर गावातील इतर इ्च्छुकांनी स्वतंत्र पॅनल करुन त्यांना आव्हान दिले होते. 

Web Title: Dominance of Auti-Mapari in Ralegan Siddhi