बोगस डॉक्टरविरुद्ध राहुरीत गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 27, 2017 15:02 IST2017-04-27T15:02:43+5:302017-04-27T15:02:43+5:30
वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय सेवा देणाºया बोगस डॉक्टर विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

बोगस डॉक्टरविरुद्ध राहुरीत गुन्हा दाखल
आ नलाइन लोकमतराहुरी (अहमदनगर), दि़ २७ -वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय सेवा देणाºया बोगस डॉक्टर विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हबीब नबाब शेख (रा. खांबे ता़संगमनेर) असे त्याचे नाव आहे़म्हैसगाव येथे वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसतांना बोगस डॉक्टर म्हणून काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ़ चंद्रशील सांत्वन ठोकळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली़ शेख यांच्याकडे एक रूग्ण पाठविला असता त्यांनी इंजेक्शन देऊन औषधोपचार केले़ शेख हे म्हैसगाव येथे अनेक वर्षांपासून वैद्यकीय उपचार करीत होते़ पोलीस पोपट टिक्कल हे पुढील तपास करीत आहेत़बोगस डॉक्टरांची प्रक्टिस म्हैसगाव व चिखलठाण या परिसरात आणखी चार बोगस डॉक्टर रूग्णांवर उपचार करीत असल्याची चर्चा आहे़ या तथाकथित डॉक्टरांविरूध्दही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.