जामखेड शहरात डॉक्टरचे घर फोडले
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:12+5:302020-12-07T04:15:12+5:30
जामखेड : शहरातील सदाफुले वस्तीवर डॉ. संदीप बेलेकर यांच्या वडिलांना मारहाण करून घरातील एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांच्या ...

जामखेड शहरात डॉक्टरचे घर फोडले
जामखेड : शहरातील सदाफुले वस्तीवर डॉ. संदीप बेलेकर यांच्या वडिलांना मारहाण करून घरातील एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना रविवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. शहरासह तालुक्यातील चोऱ्यांचे सत्र सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरात एक महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. तालुक्यात एकीकडे बिबट्यासदृश प्राण्यांची तालुक्यात दहशत आहे, तर दुसरीकडे चाेरांचाही धुमाकूळ सुरू आहे. शहरातील सदाफुले वस्ती डॉ. संदीप जगन्नाथ बेलेकर हे मुलांसमवेत वरील मजल्यावर झोपले होते. त्यांचे वडील हे खालील खोलीत झोपले होते. याच दरम्यान रविवारी रात्री दीडच्या सुमारास तीन चोरांनी घराच्या पाठीमागील बाजूने आत प्रवेश केला. संदीप बेलेकर झोपलेल्या खोलीची कडी बाहेरून लावली. यावेळी खालच्या खोलीतील बेडरूमचा दरवाजा लावलेला नव्हता. त्यामुळे चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील उचकापाचक करत असताना संदीप यांचे वडील जगन्नाथ बेलेकर यांना जाग आली. त्यांनी चोरांना हटकले. चोरांनी लाकडी दांडक्याने जगन्नाथ बेलेकर यांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. कपाटातील १ लाखाचा रोकडसह सोन्या-चादींचे दागिने असा ४ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास केला.