डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:08+5:302021-06-10T04:15:08+5:30
म्युकरमायकोसिस या बुरशीचा संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळून येत आहे. या बुरशीचा संसर्ग नाक, घसा, जबडा ...

डॉक्टरांचा सल्ला
म्युकरमायकोसिस या बुरशीचा संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळून येत आहे. या बुरशीचा संसर्ग नाक, घसा, जबडा आणि दात यापासून सुरू होऊन डोळे, मेंदूपर्यंत पोहोचून दृष्टीवर परिणाम करू शकतो, प्रसंगी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
कारणे- १) मधुमेह : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणाबाहेर असल्यास
२)स्टेरॉईडस् : जास्त दिवस स्टेराईडस् इंजेक्शन अथवा गोळ्या चालू असल्यास
३) रोग प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार असल्यास उदा. एआयडीएस
४) वयस्कर व्यक्ती
५) जास्त दिवस ऑक्सिजनची गरज पडली असल्यास
लक्षणे : गालावर दुखणे, चेहऱ्यावर मुंग्या येणे, नाक कोरडे पडणे, नाकातून काळा स्त्राव येणे, दात दुखणे, दात हलायला लागणे, नाकावर व टाळूवर काळे डाग उमटणे, डोळा दुखणे, डोके दुखी, दोन दोन प्रतिमा दिसणे, दृष्टी मंदावणे आदी.
निदान :एन्डोस्कोपी, एमआरआई, बायओप्सी
म्यकरमायकोसिस या बुरशीचा संसर्ग फार वेगात पसरतो. म्हणून लवकर निदान व उपचारास सुरूवात केल्यास ऑपरेशनची गरज पडणार नाही. (लक्षणे दिसल्यास लगेच कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविणे, डोळे दुखत असल्यास नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांना दाखविणे)
----
डॉ. सचिन वहाडणे, डॉ. अनिल आठरे