घरकुलाचे काम पूर्ण करा, अन्यथा पैसे परत जातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:53+5:302021-02-17T04:25:53+5:30
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, तिसगाव, मिरी परिसरातील अनेक गावात घरकूल योजनेखाली गोरगरिबांच्या घरांची कामे चालू आहेत. ही घरकूले ...

घरकुलाचे काम पूर्ण करा, अन्यथा पैसे परत जातील
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, तिसगाव, मिरी परिसरातील अनेक गावात घरकूल योजनेखाली गोरगरिबांच्या घरांची कामे चालू आहेत. ही घरकूले एका महिन्यातच पूर्ण करण्याचा शासनाचा आदेश आहे. घरकुलांचे बांधकाम मार्चअखेर पूूर्ण न झाल्यास घरकुलाची रक्कम परत जाणार असल्याच्या भीतीने लाभार्थी लोकल वाळू, कच, माती मिळेल त्याने बांधकाम पूर्ण करण्याच्या विचारात आहेत.
घरासाठी लागणारी वाळू, कच, मातीसाठी योजनेतील लाभार्थी वणवण फिरत आहेत. मात्र या भागातील ट्रॅक्टर, टेम्पो चालक या भागात फिरणाऱ्या पोलीस पथकामुळे चांगलेच धास्तावलेले असल्याने लोकल वाळू, कच, माती आणण्यास तयार नाहीत. आठ दिवस उलटून तरी या भागातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर अडविणाऱ्या पोलिसांची साधी चौकशी देखील झाली नाही. परिसरात चालू असलेल्या घरकुलासाठी वाळू, कच, माती आणण्यास वाहन चालकास शासनाने परवाना द्यावा किंवा घरकुलास मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, सेनेचे नेते रफिक शेख, ग्रा. पं. सदस्य रोहित अकोलकर, सुनील अकोलकरसह लाभार्थींनी केली आहे.
...
घरकुलासाठी लागणारी लोकल वाळू, कच, माती, दगड वाहतुकीसाठी शासनाने तात्पुरता का होईना वाहनधारकांना परवाना द्यावा यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत.
-संध्याताई आठरे, जिल्हा परिषद सदस्य.