कालभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:25+5:302020-12-05T04:37:25+5:30
नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दहा भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झालेला ...

कालभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण
नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दहा भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झालेला आहे.
दहा भाविकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करत हा सोहळा साध्या पद्धतीने यावर्षी पार पडत असून ७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता जन्मोत्सव सोहळा होणार आहे. श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सोहळ्यात मंगळवार, दि.१ डिसेंबर ते मंगळवार दि.८ डिसेंबर या कालावधीत हा सोहळा साध्या पद्धतीने होत आहे. सकाळी दहा भाविकांच्या उपस्थितीत रामनाथ महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व विजय महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ हे कार्यक्रम होत आहे. कालभैरवनाथांचा मुख्य जन्म सोहळा सोमवारी (दि.७) रात्री १२ वाजता पुष्पवृष्टी करून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे, तर मंगळवारी (दि.८) हरिभक्त परायण रामनाथ महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
फोटो : ०२ कालभैरवनाथ
बहिरवाडी येथे कालभैरवनाथ मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली.