ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:44+5:302021-04-18T04:20:44+5:30
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्ड मुंबई ...

ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्ड मुंबई (एमएसबीटीई) बोर्डाने नुकताच निकाल जाहीर केला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली होती. याचा उत्कृष्ट निकाल लागला.
सर्व विभागातून तृतीय वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातून अनुराधा पंडित हिने ९४.४२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रथम वर्षातील मेकॅनिकल विभागातील पूजा दहातोंडे (९४.२९ टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. मेकॅनिकल विभागातील साधना दहातोंडे (९३.८६ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला.
ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
संगणक विभागात तृतीय वर्षातील विनायक कापसे (९०.५६ टक्के), तृतीय वर्षातील जगदाळे वैष्णवी आणि परेश जावळे यांना (९०.२२ टक्के),
इलेक्ट्रॉनिक्स विभागात तृतीय वर्षातील प्रल्हारे ब्रम्हा (८७.६५ टक्के), तृतीय वर्षातील मुंगसे सौदामिनी (८५.१६ टक्के), द्वितीय वर्षातील ऋषभ कर्डिले (८५.०६ टक्के),
स्थापत्य विभागात तृतीय वर्षातील यश रोबेवर (८८ टक्के), तृतीय वर्षातील सुजित अंबाडे (८७.९० टक्के), द्वितीय वर्षातील शुभम मुलुख (८५.४४ टक्के),
मेकॅनिकल विभागात द्वितीय वर्षातील आशिष द्विवेदी (८७.३३ टक्के), तृतीय वर्षातील अभिजय वैष्णव (८३.९१ टक्के) आणि आदित्य जाधव (८३.५ टक्के).
सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. वैभव दुधे, प्रा. सुरज काळे, प्रा. विनोद भालेकर, प्रा. योगेश मानळ, प्रा. संकेत थोरे आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य एच.जे.आहिरे यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर, प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी गुणवंतांचे कौतुक केले आहे.