दिव्यांगी लांडेला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST2021-02-26T04:28:19+5:302021-02-26T04:28:19+5:30
केडगाव : येथील दिव्यांगी कृष्णा लांडे हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा ...

दिव्यांगी लांडेला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
केडगाव : येथील दिव्यांगी कृष्णा लांडे हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.
पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा रायपूर (छत्तीसगड) कोटा स्टेडियम येथे २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुरू आहेत. ट्रॅक रेसर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनची खेळाडू दिव्यांगी कृष्णा लांडे ही महाराष्ट्राकडून १४ वर्षे वयोगटात ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने ८.०१ सेकंद अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. गेल्यावर्षीही तिने १०० मीटर, २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक पटकावले होते.
दिव्यांगी ही उद्धव अकॅडमीमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत आहे.
दिव्यांगी एनआयएस कोच व महाराष्ट्र राज्य ॲथेलॅटिक्स असोसिएशनचे सहसचिव दिनेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वाडिया पार्कवर सराव करत आहे. यशाबद्दल दिव्यांगीचे छत्रपती पुरस्कारविजेते रंगनाथ डागवाले, छत्रपती पुरस्कारविजेते सुनील जाधव, महाराष्ट्र शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, कबड्डीचे सहसचिव विजयसिंह मिस्किन, संचालक महेंद्र हिंगे आदींनी कौतुक केले.
--
२५ दिव्यांगी लांडे