पारदर्शक कारभार असल्यास लाभांश वाटप होतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST2021-02-26T04:29:34+5:302021-02-26T04:29:34+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव सेवा संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना यावर्षीही संस्थेच्या माध्यमातून बारा टक्के लाभांश वाटप करण्यात येत ...

पारदर्शक कारभार असल्यास लाभांश वाटप होतेच
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव सेवा संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना यावर्षीही संस्थेच्या माध्यमातून बारा टक्के लाभांश वाटप करण्यात येत आहे. लाभांश हा शेतकऱ्यांचा हक्काचा आहे. ज्या संस्थेचा कारभार पारदर्शक असतो, त्या संस्था हमखास सभासदांना लाभांश वाटपाचे नियोजन करतात, असे प्रतिपादन सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब लवांडे यांनी केले.
तिसगाव सेवा संस्थेच्या माध्यमातून सभासदांना ज्येष्ठ सभासद गयाबाई मरकड यांच्या हस्ते लाभांश वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष भारत गारुडकर, उपाध्यक्ष असलम शेख, माजी अध्यक्ष जगन्नाथ लोंढे, अहमद शेख, संचालक नारायण भडके, अरुण रायकर, सुमन लवांडे, शरद शेंदूरकर, बाबूराव घोडके, वाल्मीक गारुडकर, मुसा तांबोळी, रमेश नरवडे, कदीर शेख, राजू घोडके, सादिक पठाण, भाऊसाहेब वाघ, श्रीकांत पुंड, भाऊसाहेब लोखंडे, उपसरपंच फिरोज पठाण, रमेश लवांडे, शंकरराव कातखडे, अरुण पुंड, शाखाधिकारी मोरे आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव संतोष आकोलकर यांनी आभार मानले. (वा. प्र.)