जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित आढळले, पैकी १३ नगर शहरातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:01 IST2020-07-06T17:00:41+5:302020-07-06T17:01:35+5:30
अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित आढळले, पैकी १३ नगर शहरातील
अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर शहरात भराड गल्ली येथे ०६, तोफखाना ०४, शास्त्रीनगर ०१, सातभाई मळा ०१ आणि गानु बाजार येथे ०१ रुग्ण आढळून आला आहे. गवळी वाडा (भिंगार) ०१, राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे ०१, रानेगाव (शेवगाव) ०१, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला आहे. कर्जत तालुक्यातील माही जळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला आहे.
जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्ण संख्या आता २०३ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ४१८ इतकी आहे. आतापर्यंच मृत्यू १७ झाले आहेत.
एकूण नोंद रुग्ण संख्या ही ६३८ आहे.