जिल्हा पोलीस अधीक्षकांना दंड !
By Admin | Updated: June 29, 2014 00:27 IST2014-06-28T23:41:14+5:302014-06-29T00:27:13+5:30
अहमदनगर: एका महिलेच्या मृत्युच्या प्रकरणात आत्महत्या नव्हे तर खून असल्याचे फिर्यादिचे म्हणणे होते. त्याचा तपास करण्याचे खंडपीठाने आदेश देऊनही तपास न केल्याचे निदर्शनास आल्याने

जिल्हा पोलीस अधीक्षकांना दंड !
अहमदनगर: एका महिलेच्या मृत्युच्या प्रकरणात आत्महत्या नव्हे तर खून असल्याचे फिर्यादिचे म्हणणे होते. त्याचा तपास करण्याचे खंडपीठाने आदेश देऊनही तपास न केल्याचे निदर्शनास आल्याने औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि आर. आर.आर. बोरा यांच्या न्यायपीठाने पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंदे यांना दहा हजार रुपयांचा दंड केला आहे. ही खर्चात्मक दंडाची रक्कम त्यांनी स्वउत्पन्नातून भरायची आहे.
नगर येथील शिक्षिका स्मिता दीपक घोडके (रा. कोठी) यांचा २०१२ मध्ये खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली होती. मात्र महिलेची बहिण उज्ज्वला मधुकमल हिवाळे यांनी आत्महत्या नव्हे तर पतीनेच खून केल्याची फिर्याद दाखल केली होती. मात्र पोलिसांनी ही फिर्याद घेण्यास नकार दिल्याने फिर्यादीने खंडपीठात याचिका दाखल केली. या प्रकरणात पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधिक्षक शिंदे यांनी या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्याम घुगे यांना तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र घुगे यांनी या प्रकरणात कोणताही तपास केला नाही. त्यामुळे फिर्यादी पुन्हा खंडपीठात गेले. खंडपीठाने नोटीस पाठवून पोलीस अधिक्षकांना अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते.
मात्र १३ मार्च, १२ जून या दोन्ही तारखांना अहवाल प्राप्त झाला नसल्याने २३ जून रोजी खंडपीठाने शिंदे यांना १० हजार रुपये खर्चापोटी देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे. फिर्यादीतर्फे अॅड. काकासाहेब तांदळे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
आरोपी जामिनावर
या घटनेतील महिलेचा पती दीपक रमेश घोडके यानेच स्मिता यांचा खून केल्याचे फिर्यादीची तक्रार होती़ मात्र, या अनुषंगाने खंडपिठाच्या आदेशानंतरही पोलिसांनी तपास कामात हलगर्जीपणा दाखविला़आरोपी जामिनावर सुटेलेले आहेत़