स्वच्छतेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST2021-02-24T04:23:37+5:302021-02-24T04:23:37+5:30

स्वच्छतेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपमहापौर मालन ...

District Superintendent of Police Office first in cleanliness | स्वच्छतेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय प्रथम

स्वच्छतेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय प्रथम

स्वच्छतेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त यशवंत डांगे, हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकार आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्हा पोलीस उपधीक्षक प्रांजल सोनवणे व पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. ऐतिहासिक वस्‍तुसंग्रहालयाच्यावतीने डॉ. संतोष यादव, आयकर अधिकारी विकास गायकवाड हे उपस्थित होते तसेच गीता तांबे, गोदावरी कीर्तने, उपप्राचार्य कांचन पापडेजा, वैशाली मेकर, प्रमोद चट्टा, वर्धमान शिंगवी, देवेंद्र मट्टा, डॉ. राकेश गांधी, डॉ. अशिष भंडारी, डॉ. गणेश जंगले, डॉ. अमितकुमार पवार, मेजर देवदान कळकुंबे यांना पारितोषिक वितरित करण्यात आले.

...

शासकीय कार्यालये विभाग - १) प्रथम- जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय , २) द्वितीय-ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय , ३) तृतीय- सहाय्यक आयुक्त आयकर कार्यालय

..

शाळा विभाग- १) प्रथम -सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, तारकपूर , २) द्वितीय -शिवसामर्थ्य प्राथमिक विद्यालय, केडगाव , ३) तृतीय -रुपीबाई मोतीलालजी बोरा, न्यू इंग्लिश स्कूल,

...

हाॅटेल विभाग- प्रथम- हाॅटेल औरस, २) द्वितीय- सिंग रेसिडेन्सी, ३) तृतीय -हाॅटेल अर्चना

...

हॉस्पिटल - प्रथम -सुरभी हाॅस्पिटल, द्वितीय- बुथ हाॅस्पिटल , तृतीय - मॅककेअर सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल,

Web Title: District Superintendent of Police Office first in cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.